मुंबई, दि. ३( punetoday9news):- सध्या ५० टक्के प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी महामंडळाने २ आसनांमध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची चाचणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.
एसटी महामंडळाकडून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस चालवताना ४४ ऐवजी २२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. ही परिस्थिती पुढेही सुरू राहिल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे.
एसटी चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हटले कि, पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी चालवण्याचा प्रस्ताव गेल्या आठवडय़ात राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यास राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच त्याची दापोडी येथे चाचणी केली जाणार आहे.
टाळेबंदीआधी एसटीच्या १८ हजार बसमधून दररोज ६० ते ६५ लाख प्रवासी प्रवास करत असल्याने त्यातून दररोज २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्नही मिळत होते. परंतु गेल्या ५ महिन्यांत हेच उत्पन्न पूर्णपणे बुडाले. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने चालवतानाच खर्चातही बचत करण्याचा प्रयत्न आहे.
Comments are closed