मुंबई, दि. ३( punetoday9news):- राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मंत्री सामंत म्हणाले कि, “घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाईन, ऑफलाईन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल.”
“उद्या शासनाला तो १२ वाजता सादर केला जाईल. अहवाल मिळाल्यांतर तो कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू.”
३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो, ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडू.”
“१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा संबंधित विद्यापीठांचा प्रयत्न असणार आहे. पण सध्या ज्या तारखा ठरवत आहोत त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील अशीच शक्यता आहे. तर ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे.”
“युजीसीकडे अहवाल दिल्यानंतर ३१ ऑक्टोबपर्यंत निकाल लावण्याचं बंधन विद्यापीठांवर असणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
Comments are closed