दिल्ली, दि. ३(punetoday9news):- पाकच्या नेहमीच्या कुरापती ह्या भारतासाठी नवीन नाहीत मात्र सद्यस्थितीतील परिस्थिती पाहता चीनचा रोज नवीन चेहरा भारतासमोर उभा राहत असल्याने भारताने गांभीर्याने विचार करायला हवा असे मत व्यक्त करताना चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरोधात युद्ध करू शकतात, असा इशारा सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) पाकिस्तानला चीनकडून मिळणाऱ्या आर्थिक आणि लष्करी पाठबळाकडे आपण सतर्कतेने पाहणे आवश्यक आहे कारण भारतीय पश्चिमेवरील सीमेसह पूर्व सीमेवरही संघर्ष वाढत आहे. यासाठी आपण तयार असले पाहिजे. चिनी सैन्याने अलिकडेच सीमेवर केलेल्या काही आक्रमक कारवाया आमच्या लक्षात आल्या आहेत. त्यांना चोख उत्तर देण्याची क्षमता भारतात आहे, असे रावत म्हणाले.
तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार झाला होता. यानुसार भारत अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक अशी अमेरिकन संरक्षण सामग्री घेईल.
Comments are closed