मालमत्ता कर माफ केल्याबद्दल मानवी हक्क, संरक्षण व जागृतीच्या वतीने महापालिकेचे आभार.

 

पिंपरी,दि. ४(punetoday9news):-  पिंपरी चिंचवड महानगपालिकेने लााॅकडाऊन कालावधीतील  मालमत्ता कर माफ करावा म्हणुन मानवी हक्क संरक्षण व जागृती च्या वतीने संस्थेचे शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य, नगर विकास सचिव ,महाराष्ट्र राज्य व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवड यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती.

सदर निवेदनाची दखल घेवून चिंचवड पिंपरी महानगपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर माई ढोरे तसेच सर्व राजकीय प्रतिनिधी, अधिकारी यांनी अडचणीच्या काळातील सहा महिन्यांचा  मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेतला.

त्याबद्दल  शहरातील २५ लाख नागरिकांच्या वतिने आण्णा जोगदंड यांनी आभार मानले.

Comments are closed

error: Content is protected !!