मुंबई, दि. ४(punetoday9news):- प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अभिनेते नवनवीन फंडे आजमावत असतात पण कंगना राणावतला हा फंडा चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत. कारणही तसेच आहे कारण ज्या मुंबईत येवून स्वतःचे करिअर घडवले त्याच मुंबई पोलिसांवर कंगनाने आरोप केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडे बोल सुनावले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देत मला कोण अडवणार हे दाखवाच असे प्रत्युत्तर दिल्याने हा वाद चांगलाच चिघळण्याची चिन्हे आहेत त्यात महाराष्ट्रातील चाहते नाराज होण्याचीही भीती निर्माण झाली आहे.

संजय राऊत यांनी याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांनी म्हटलं होते की, “पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणे हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचे रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवले. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारने, गृहमंत्रालयाने कठोर कारवाई केली पाहिजे”. हे मुंबई पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याच मोठे कारस्थान दिसत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

#

Comments are closed

error: Content is protected !!