पिंपरी, दि. ४ ( punetoday9news ):- पिंपरी चिंचवड येथील अस्थिव्यंग शल्यचिकित्सक (ऑर्थोपेडिक सर्जन) डॉ.अजितस्वामी यांनी (ऑर्थोपेडिक्स) अस्थिविकार विषयामधील प्रतिष्ठित पीएचडी पदवी प्राप्त केली. डॉ.डी.वाय.विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमात त्यांना पीएचडी पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ.अजित स्वामी हे पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ऑर्थोपेडिक स्पाईन अँड जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. ते स्पाईन आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीचा सराव करतात. त्यांनी फ्रान्समध्ये स्पाईन सर्जरीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आहे ते विशेष करून मानेच्या हाडाच्या, पाठीच्या मणक्याच्या, कमरेसंबंधी तसेच वक्षस्थळावरील शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
“एलोब जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी” ह्या प्रबंध विषयावर बोलताना डॉ. स्वामी म्हणाले रुग्ण कोपरा शस्त्रक्रिया करण्याऐवजी रुग्ण कोपर अपंगत्वासह जगतात. योग्य उपचार आणि सातत्यपूर्ण निकालांसह एल्बो जॉइंट रिपेलेमेंटसह कोपर अपंगत्ववर मात करीत त्यांनी बऱ्याच रुग्णांची शस्त्रक्रिया करून सिद्ध केले आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे व या विषयातील सखोल अनुभवामुळे हे शक्य होऊ शकले.
डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आणि अध्यापनात त्यांना नेहमीच रस होता आणि पीएचडी ही त्यांच्या ७ वर्षांच्या कठोर परिश्रमाची परिणती आहे. स्पाइन आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात संशोधनात संतुलन राखणे कठीण होते, हे त्यांनी कबूल केले.
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णलयातील सेवा व सुविधांविषयी बोलताना डॉ स्वामी म्हणाले की रुग्णालयीन व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमुळे जागतिक दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान येथे उपलब्ध असून ऑपरेशन थिएटरची मानके ही युरोपियन मानकांच्या बरोबरीने आहेत त्यामुळे येथेच मी स्पाईन फेलोशिप केले आहे. जागतिक स्तरावरील ऑपरेटींग मायक्रोस्कोप येथे असल्यामुळे स्पाइन सर्जरी आणि सर्व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी येथे होऊ शकतात. डॉ.अजित स्वामी प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या अस्थिविकारावर सल्ला व समुपदेशनासाठी उपस्थित असतात.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपकुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, यांनी डॉ. अजित स्वामीचे कौतुक केले आहे.
Comments are closed