मुंबई, दि. ५ (punetoday9news):- राज्य सरकारने सातबारा उताऱ्यामध्ये नवे बदल करण्यास मान्यता दिली असून यानुसार आता शासनाचा व ई- महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क नव्या स्वरुपात मिळणाऱ्या सातबारा उताऱ्यामध्ये असणार आहे.
सातबाराच्या उताऱ्यामध्ये बदल करण्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जमिनीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी उपयुक्त असलेल्या सातबाराच्या स्वरूपात ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच असा बदल होत आहे.
सदरील बैठकीला महसूल विभागाचे अप्पर सचिव डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, महसूल विभागाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले उपजिल्हाधिकारी रामदास जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आधीच्या तुलनेत शेती आणि बिगरशेतीसाठीही स्वतंत्र सातबारा करता येणार असून तो वाचण्यासही सोपा असणार आहे. त्यामुळे शेतजमिनीच्या बाबतीत फसवणूक कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Comments are closed