मुंबई, दि.५( punetoday9news):- करोना विषाणूमुळे जगभरात मंदीचे वातावरण बनले असताना भारतातही गेल्या मंदीचा फटका बसून अनेकांना नोकरी गमावावी लागली आहे. आर्थिक संकटात कंपन्यांनी कर्मचारी कपात आणि कामगार कपात केली आहे. त्यातच आता टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) २० हजार कंत्राटी कामगारांना घरी पाठवणार असल्याचे वृत्त आहे.
बीएसएनएल कंपनीच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे . बीएसएनएलने याआधीच ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा निर्णय अशा वेळी घेतला गेला आहे जेव्हा या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही
बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनेने कंपनीचे अध्यक्ष वी के पुरवार यांना पत्र लिहून कंपनीच्या नाजूक स्थितीबाबतीत माहिती सांगितली आहे. मागील काही महिन्यांपासून पगार न मिळाल्याने १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे .
बीएसएनएल कंपनीच्या एचआरने एक सप्टेंबरला सर्व मुख्य व्यवस्थापकांना खर्चात कपात करण्याचे आदेश दिले. यात कंत्राटी कर्मचारी कमी करण्यास सांगितले होते. त्याच बरोबर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी ठेवण्याची गरज नसल्याचेही म्हटले होते. बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे महासचिव पी अभिमन्यू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीने ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले असून नवीन आदेशानुसार २० हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.
Comments are closed