मुंबई, दि.६(punetoday9news) :- राज्यात येत्या १५ सप्टेंबरपासून ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.
राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन सारी, इतर व्याधींची लक्षणे असणाऱ्या आणि 60 वर्षांपुढील नागरिकांचा विदासंच (डेटा) तयार केला जाणार आहे.
गरज असल्यास संबंधित रुग्णास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. ही मोहीम १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले कि, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करताना शासकीय दरांपेक्षा जादा रक्कम आकारल्यास संबंधित रुग्णालयांना पाचपट दंड आकारण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
गुन्हा दाखल करण्याचे किंवा रुग्णालयाला महात्मा फुले योजनेतून वगळण्याचेही प्रशासनाला अधिकार दिले आहेत. दीड लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रत्येक देयकांचे पूर्वलेखापरीक्षण झालेच पाहिजे, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
Comments are closed