दिल्ली ,दि. ६(punetoday9news ) :- देशात विक्रीच्या खपानुसार ‘या’ गाड्या टॉप-10 लिस्टमध्ये आहेत..
टॉप-10 लिस्ट:
मागील ऑगस्ट महिन्यात Maruti Swift ही सर्वात जास्त विक्री झालेली कार ठरली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 14,869 मारुती स्विफ्टची विक्री झाली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर Maruti सुझुकीने बाजी मारली आहे. Maruti ची Alto (अल्टो) दुसऱ्या स्थानावर आहे. ऑगस्टमध्ये 14,397 कारची विक्री झाली.
Marutiची WagonR तिसऱ्या क्रमाकांवर आहे. ऑगस्ट महिन्यात 13,770 यूनिटची विक्री झाली.
चौथ्या क्रमांकावर सुद्धा Maruti ची Dzire आहे. ऑगस्टमध्ये 13,629 कारची विक्री झाली.
Hyundai च्या Creta च्या यावर्षी ऑगस्ट महिन्यात 11,758 यूनिटची विक्री झाली.
Maruti Baleno 10,742 यूनिट विक्रीसह सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 10,742 बलेनोची विक्री झाली.
Kia Seltos ने आपला जादू दाखवत सातवे स्थान बळकावले आहे. तब्बल 10,655 सेल्टॉस कारची विक्री झाली आहे.
10,190 यूनिट विक्रीसह Hyundai Grand i10 आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
9व्या स्थानावर मारुतीची लोकप्रिय Ertiga आहे. ऑगस्टमध्ये 9,302 मारुती एर्टिगाची विक्री झाली.
Maruti Eeco ही 10व्या स्थानावर आहे. ऑगस्ट महिन्यात 9,115 यूनिटची विक्री झाली आहे.
Comments are closed