मुंबई,दि.६ ( punetoday9news ) :- मुंबईची तुलना पीओकेशी करणाऱ्या कंगनाला शिवसेनेने मुंबईत न येण्याचा इशारा दिला. त्यानंतर मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार कोणाच्या बापात हिम्मत असेल तर अडवा असे खुले आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने कंगनाला Y दर्जाची सुरक्षा पुरवणार असल्याचे सांगितले. यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
केंद्र सरकार कंगनाला आता Y सुरक्षा देत असतील तर ते देशाचं – महाराष्ट्रचे दुर्देव असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. POK वर विश्वास असलेल्या आणि मुंबई पोलीसांवर अविश्वास असलेल्या कंगना राणावत व्वा रे व्वा, ह्यांना Y काय Z सुरक्षा दिली पाहिजेया भाजपच्या पोपट आहेत, भाजपच्या मुखातील बोलत आहेत, उद्या या विधानपरिषद किंवा राज्यभेवर भाजपकडून सभागृहात दिसतील तर नवल वाटायला नको.
कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने दिला होता. तर, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे मत खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते. तसेच भाजपनेही कंगनाला पाठिंबा देण्याबाबत यू टर्न घेतला होता. तसेच सिनेक्षेत्रातील मंडळींनीही कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्राबद्द कृतज्ञता बाळगण्याचा सल्ला दिला होता. अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्ष टोले लगावले होते.
‘जर त्या मुलीने महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार केला जाईल. तिने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटले , अहमदाबाद विषयी असेच बरळण्याचे धाडस तिच्यात आहे का ?’ असे राऊत म्हणाले.
मुंबईसाठी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी कंगना, गुजरात या पंतप्रधानांच्या राज्यातील अहमदाबादबाबत असं वेडवाकडं बोलण्याची हिंमत दाखवणार का, असा सवाल करत राऊत यांनी तिच्यावर तोफ डागली. तेव्हा आता कंगना यावर नेमकी काही प्रतिक्रिया देणार की, सबंध महाराष्ट्राचीच माफी मागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
Comments are closed