मुंबई, दि.७(punetoday9news):- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

याआधी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल आला होता.

विदेशातून अज्ञात व्यक्तीने दोघांच्याही घरातील लँडलाइन फोनवर कॉल केल्याचे उघड झाले असून त्यादृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे.

धमकी मिळालेले नेते हे महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते असून या धमक्यांचा पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे. तसेच सदरील नेत्यांच्या निवासस्थानांना अधिक सुरक्षा देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी राज्यमंत्रिमंडळाने अपेक्षा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका देशमुख यांनी अभिनेत्री कंगनावर केल्याने त्यांना धमकीचे फोन येत असल्याचे बोलले जात आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!