नाशिक, दि. ७(puetodaynews):- दिंडोरीतील आंबेवणी येथे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या उपस्थित आंबेवणी, वरखेडा , मातेरेवाडी या गावातील अनेक युवकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
या वेळी मनोगत व्यक्त करताना संदीप जगताप यांनी नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोठे संघटन उभे करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राजू शेट्टीच्या नेतृत्वात लढण्याचा निर्धार केला. आपण वेळप्रसंगी संघर्ष करून शेतकऱ्यांना , गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. यावेळी दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड, प्रा.किरण पाटील, शंकर फुगट उपस्थित होते.
या प्रसंगी पंकज सोनवणे,निखिल मातेरे,श्रीकांत राजगुरु,संदीप वडजे,सागर भावल,संतोष चव्हाण
राहूल बागूल या तरुणांवर तालुका अध्यक्ष सचिन कड यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या विविध नेेेेनेमणुकाही करण्यात आल्या.
प्रतिक्रिया–
आज शेतकऱ्यांनी संघटित होऊन दबाव गट तयार करणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सर्व शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. फक्त त्यांचे विचार गावागावात पोहचवणे ही आमची जवाबदारी आहे. म्हणून “आता गाव तिथं स्वाभिमानी” हे अभियान आम्ही अधिक प्रभावी पणे राबवणार आहोत. संघटनेत तरुणांना संधी देऊन शेतात राबणारे व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे स्वच्छ विचारांचे कार्यकर्ते व त्यातूनच मातीची जाणीव असणारे खंबीर नेतृत्व राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात आम्ही तयार करू.
– संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष – स्वाभिमानी शेतकरी संघटना
Comments are closed