पुणे, दि.७(punetoday9news):- माजी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आपल्या सीएमओ पदावर कामास प्रारंभ केला.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव राज्यात मार्च-२०२० पासून सुरू आहे. कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व त्याबाबतीत शासनाला प्रादुर्भावासंबंधित उपलब्ध होणारी माहिती विश्लेषण करून त्याबाबतीत पुढील उपाययोजना ठरविण्याच्या दृष्टीने व कोव्हिड-१९ प्रादुर्भाव संपल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याबाबतीत व इतर अनुषंगिक बाबींबाबत मुख्यमंत्री महोदयांना सल्ला देण्यासाठी माजी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी कामास प्रारंभ केला. आज त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.
डॉ.दिपक म्हैसेकर, भा.प्र.से. (२००३) हे विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे या पदावरून दिनांक ३१/०७/२०२० रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. पुणे विभागात कोव्हिड-१९ च्या नियंत्रणासाठी काम करताना त्यांचा अनुभव विचारात घेता, त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार (Advisor, CMO) म्हणून मानसेवी (Honorary) तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांचे मुख्यालय पुणे येथे आहे.
Comments are closed