मकोका गुन्हा दाखल असलेल्या रावण गँग मधील सदस्याला जामीन मंजूर.
पिंपरी, दि.८(punetoday9news):- पिंपरी- चिंचवड मधील कुख्यात रावण टोळीचा सदस्य असल्याचा आरोप असलेल्या नऊ संशयित आरोपी हनुमंत चंदनशिवे यांस पंचवीस हजार रुपये व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तळेगांव पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर सीआरपीसी कलम ४३९ अंतर्गत सशर्त जमीन देण्यात आला.
तळेगांव येथे आठ ते नऊ रावण टोळीतील सदस्यांनी जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संदर्भात पोलीस पथकाने रावण टोळीच्या संशयित आरोपींना प्रत्यक्ष साक्षीदार व फिर्यादी यांच्या जबाब प्रमाणे अटक केली होती. परंतु प्रत्यक्ष ठिकाणील सीसीटीव्ही फुटेज व जबाबाबतील विसंगती या आधारावर हणमंत चंदनशिवे यांस विशेष न्यायाधीश मोका कायदा पुणे अनिरुद्ध थत्ते यांनी जामीन दिला.
आरोपी कडून वकील स्वराज सोमवंशी यांनी काम पाहिले तर सरकारी पक्ष वकील विजय फरगडे यांनी बाजू मांडली.
Comments are closed