मुंबई, दि. ८(punetoday9news):- अभिनेत्री कंगना रानावतचे पालीहिल येथील कार्यालय महापालिकेने सील करत नोटीस बजावली आहे.कंगनाच्या कार्यालयाची पाहणी महापालिका अधिकाऱ्याच्या एका पथकाने केल्यानंतर तिच्या कार्यालयाला आज नोटीस लावण्यात आली.

पालिकेच्या निदर्शनास पुढील गोष्टी आल्या आहेत त्यामध्ये कंगना पालिका अधिनियम ३५४ (ए) अंतर्गत ऑफिसचे काम घरातून करू शकत नसून तिने अनधिकृतपणे ऑफिस बांधल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे.

ऑफिसात स्वतंत्र पार्टीशन तसेच बाल्कनी एरियाचा रुम म्हणून या गोष्टी तिने केल्याने ऑफिस नियमांचं उल्लंघन झाल्याचे आढळले. तळमजल्यावरील टॉयलेटचं ऑफिस केबिनमध्ये रुपांतर, तळमजल्यावरच अनधिकृतपणे किचनचं स्टोअर रुममध्ये रुपांतर, त्याच मजल्यावर अनधिकृतपणे पँट्री केल्याचे आढळले.

पहिल्या मजल्यावरील रुममध्ये अनधिकृतपणे बदल तसेच तिथेच पूजा घरात बेकायदेशीर पार्टीशन, अनधिकृतपणे टॉयलेट, मुख्य दरवाजाची बदललेली पोझिशन आढळली आहे. दुसऱ्या मजल्यावर बंगला नंबर ४ आणि बंगला नंबर ६ मधील भिंत पाडण्यात आली असून हे दोन्ही बंगले एकमेकांना जोडण्यात आले आहेत.

कंगनाने २४ तासांत इमारत बांधकामासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर न केल्यास तिच्यावर कारवाईचा इशारादेखील पालिकेकडून नोटिसीतून देण्यात आला आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!