मुंबई, दि. ९( punetoday9news):- मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते. पण, हे सरकार आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नसल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याची टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. एका निवेदनातून देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुरुवातीपासूनच न्यायालयीन बाबतीत या सरकारने दुर्लक्ष केले. कधी वकील हजर झाले नाही, तर कधी वेळेत आवश्यक परिपूर्ती केली गेली नाही. मागासवर्ग आयोग ७ महिन्यांपासून गठीत केलेला नाही. यासाठी आपण पत्रव्यवहार सुद्धा केला. पण, सरकारने त्यालाही दाद दिली नाही. असे असले तरी मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण त्यांच्यासोबत आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे
Comments are closed