पुणे दि .10 ( punetoday9news): – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच रोजगाराच्या प्रशिक्षणाच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड लिंक करुन आपला डेटा अद्ययावत करणे आवश्यक आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व नोकरीइच्छुक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या ज्या बेरोजगार उमेदवारांनी अद्याप आपल्या नोंदणीला आपापले आधार कार्ड जोडले (लिंक) केले नसेल, अशा सर्व उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ही प्रक्रिया www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन “ऑनलाईन” पध्दतीने पूर्ण करावी.अन्यथा 30 सप्टेंबर 2020 अखेर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल.
प्रत्येक उमेदवाराने तात्काळ www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन आपल्या नोंदणीस आपले आधार कार्ड ऑनलाईन पध्दतीने जोडावे आणि या सर्व सेवा / सुविधांसाठी स्वत:स सक्षम बनवून त्यांचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच आपण अशा प्रकारे आधार नोंदणी जोडण्याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयास punerojgar@gmail.com या ईमेलद्वारे कळवावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणेच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार, यांनी केले आहे.
Comments are closed