दिल्ली, दि. १०( punetoday9news):- पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवर प्रचंड तणावाची स्थिती असताना, युद्धाच्या प्रसंगात भारताला हवाई वर्चस्व मिळवून देणाऱ्या अत्याधुनिक ‘राफेल’ फायटर विमानांचा अंबाला एअर बेसवर झालेल्या शानदार सोहळयात आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. 
 4.5 जनरेशनचे हे ‘राफेल’ विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे. शत्रूला धडकी भरवणारी शस्त्रास्त्रे ही राफेलची खासियत आहे.
 29 जुलैला राफेल फायटर विमानांचे भारतात आगमन झाले होते. राफेलच्या पहिल्या तुकडीत 5 विमाने असून Golden Arrow म्हणून ही स्क्वाड्रन ओळखली जाईल.
 2016 मध्ये भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदीचा 60 हजार कोटींचा करार केला होता. त्यातली पहिली 5 विमाने भारताला मिळाली आहे. पुढच्या 2 ते 3 वर्षात टप्याटप्याने उर्वरित राफेल विमाने भारताला मिळतील.
 अंबाला एअर बेसवर झालेल्या या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली, IAF प्रमुख आर.के.भदौरिया, सीडीएस बिपीन रावत, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि फ्रान्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!