मुंबई, दि. १०( punetoday9news):- नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरून बदली करत तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणचा कारभार देण्यात आला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर मुंढे यांनी अद्याप या प्राधिकरणाचे सचिवपद स्वीकारलेले नाही. तोपर्यंत राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केली आहे.
तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणाचा कार्यभार देण्यात आला होता. याठिकाणी रुजू होऊ नका, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. तर मुंबई जीवन प्राधिकरणचा अतिरिक्त कार्यभार मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने आज दिले आहेत. एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर तसेच ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना कोणते पद मिळणार ते जाहीर केलेले नाही. त्यांच्याकडे आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याबद्दल उत्सुकता आहे.
Comments are closed