दिल्ली, दि. ११( punetoday9news):- करोनाची लक्षणे असुनही रुग्णांची ॲन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आल्यास त्या रुग्णाची परत ‘आरटी पीसीआर’ चाचणी घेण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. काही राज्यांमध्ये ही चाचणी केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. त्या तत्वांचा आधार घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन प्रकारात ‘आरटी पीसीआर’ चाचणी ही पुन्हा करणे अनिवार्य केले आहे. त्यामध्ये ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी केल्यास ती निगेटिव्ह आली तसेच ज्या रुग्णांची निगेटिव्ह चाचणी आल्यापासून २ ते ३ दिवसांच्या आत लक्षणे विकसित होणाऱ्या लक्षणेहीन निगेटिव्ह प्रकरणांमध्ये आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य केले आहे.
Comments are closed