मुंबई, दि. ११(punetoday9news):-  राज्यात कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे सुरु करण्यासंदर्भात गृह विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे खुली करण्यात यावी यासाठी भाजप, वंचितसह काही संघटनांच्या आंदोलनानंतर सरकार मंदिरे खुली करण्याच्या तयारीत आहे. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने त्याबाबत तयारी सुरु केली आहे .
राज्यातील महत्वाच्या देवस्थानांकडून मंदिरे खुली करण्यासंदर्भात आराखडा मागवण्याचा विचार असल्याची देखील माहिती आहे. शिर्डी साई संस्थान, सिद्धिविनायक मंदिर न्यास, पंढरपूर विठ्ठल मंदिर संस्थान अशा प्रत्येक देवस्थानांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार नियमावली बनवण्याचा प्रस्ताव आहे.भाविकांच्या गर्दीचे नियोजन, स्वच्छतागृह, प्रसादालाय, पूजा-अर्चा-अभिषेक अशा विधींबाबत घ्यायची काळजी या बाबींचा आराखड्यात समावेश असणार आहे. त्या आधारावर प्रत्येक देवस्थानासाठी स्वतंत्र SOP बनणार आहे.

सिद्धिविनायक मंदिरात होणार AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याची माहिती आहे. शरीराचे तापमान, तोंडावरचा मास्क किंवा दोन व्यक्तींमधील अंतर डिटेक्ट करण्याऱ्या अद्ययावत यंत्रणा / मशिन्सचा वापर होणार आहे. येत्या काही दिवसात याचा आढावा घेऊन मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.

Comments are closed

error: Content is protected !!