दिल्ली, दि. ११( punetoday9news):- केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी , शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक नवीन अॅप लाँच झाले आहे. या अॅपचे नाव ई-गोपाला असून, ई-गोपाला अॅपबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत माहिती दिली.
play.google.com/store/apps/details?id=coop.nddb.pashuposhan या लिंक द्वारे ॲप डाउनलोड करू शकता.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ह्य व्यापक प्रजनन सुधारणा, बाजारपेठ आणि माहिती पोर्टल प्रदान करते. हा एक नाविन्यपुर्ण प्रयत्न असून, याद्वारे पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
हे अॅप डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि प्राण्यांची उत्पादकता वाढवण्याचे ऑनलाईन माध्यम आहे.
या अॅपद्वारे प्राण्यांचे कृत्रिम गर्भाधान, प्राण्यांचे प्रथमोपचार, लसीकरण, आणि प्राण्यांचे पोषण इ. गोष्टींसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल.
या अॅपद्वारे प्राण्यांविषयी चारा देण्याची योग्य पद्धत, लसीकरण, गर्भधारणेचे निदान, त्या परिसरातील सरकारी योजना, मोहिमा याबद्दल माहिती मिळेल.
Comments are closed