दिल्ली, दि १२.( punetoday9news):- जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. विद्यार्थी, पालक आणि हा निकाल जाऊन घेऊ इच्छिणारे सर्व jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपले गुणपत्रक पाहू किंवा डाऊनलोड करु शकतात. तसेच आपल्या गुणपत्राची प्रिंटही काढू शकतात. दरम्यान जेईई मेन परीक्षा पास होणारे विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी 12 सप्टेंबर 2020 पासून नोंदणी सुरु होणार आहे. जेईई अडवान्सड परीक्षा 27 सप्टेंबरपासून आयोजीत केली जाणार आहे.
Comments are closed