दिल्ली, दि. १३(punetoday9news):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७० वा वाढदिवस असून, त्यादिवशी त्यांना किमान १० लाख लोकांनी सेल्फी व्हिडिओ चित्रित करून शुभेच्छा द्याव्यात यासाठी भाजपने मोहीम हाती घेतली आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार तसेच स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे.भाजपच्या आयटी विभागाने या उपक्रमाची आखणी केली आहे.
भाजपच्या आयटी विभागाने ‘हॅपी बर्थडे मोदीजी’ हा हॅशटॅग तयार केला आहे. मोदी यांनी भारतामध्ये कसा बदल घडविला त्याचे चित्र उमटावे या पद्धतीने सदर उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
देशातील विविध जाती, धर्म, पंथाचे, वेगवेगळ्या प्रदेशांचे लोक मोदी यांना वाढदिवसाच्या या हॅशटॅगवर शुभेच्छा देताना दिसावेत, अशी भाजप आयटी विभागाची अपेक्षा आहे.
मोदींना आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जी मोहीम राबविण्यात येत आहे त्याचे सारे प्रयत्न जनतेकडूनच उत्स्फूर्तपणे सुरू आहेत, असेही सांगितले जात आहे.
Comments are closed