पिंपरी, दि. १३ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड व पुणे शहरात पुन्हा लाॅकडाउन होणार अशा आशयाचे काही वृत्तवाहिन्यांचे जुने विडिओ लाॅकडाउन होणार म्हणून समाजकंटकांकडून खोडसळपणे व्हायरल होत आहेत. लागोपाठ तीन – चार आठवडे हा प्रकार चालला आहे. मात्र यामुळे सामान्य नागरिक व व्यावसायिक चांगलेच घाबरले आहेत.
काही वृत्तवाहिन्यांचे पुण्यात लाॅकडाउन होणार असे जुने मागील लाॅकडाउनचे विडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरत आहेत. या पैकी एका विडिओ मध्ये फक्त सोमवार पासून लाॅकडाउन असा उल्लेख असल्याने व नामांकित वृत्तवाहिनीचा लोगोसहित विडिओ असल्याने सुशिक्षित वर्ग सुद्धा फसून या अफवेला बळी पडत आहे तर दुसऱ्या विडिओ मध्ये १२ तारीख असा उल्लेख असल्याने सलग दुसऱ्या महिन्यात हा विडिओ १२ तारखेच्या अगोदर व्हायरल होवून नागरिक व व्यावसायिकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीं वर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्टपणे पुण्यात व पिंपरी चिंचवड शहरात लाॅकडाउन लागु होणार नसल्याचे सांगितले आहे. तरी नागरिक व व्यावसायिकांनी अशा सोशल मिडिया वर व्हायरल होणाऱ्या खोडसळ अफवा पसरवणाऱ्या मेसेज वर विश्वास ठेवू नये.
Comments are closed