मुंबई, दि.१३( punetoday9news):- मास्क व सॅनिटाइजर यांच्या किंमती निम्म्यापेक्षा कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आरोग्य मंत्रालयाकडून येत्या आठवड्यात घेतला जाणार आहे.राज्य सरकार आता अधिक कडक पावले उचलून दंडात्मक कारवाईवर भर देणार आहे. 

मंत्री टोपे म्हणाले की,  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मास्कच्या किमती वाढल्या आहेत. 13 मार्च 2020 रोजी एन-95 मास्क सहा वेगवेगळे मास्क तसेच सॅनिटाइजर हे ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ अंतर्गत अधिसूचित होते.

अचानक 30 जून 2020 रोजी केंद्राने मास्क व सॅनिटाइजरला अत्यावश्यक वस्तू कायद्यामधून वगळले. याचाच फायदा घेत अनेक कंपन्यांनी मास्कच्या किंमती 400 पट वाढविल्याचे सांगतले आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती मास्क व सॅनिटाइझरच्या किमती निश्चित करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे एन-95 मास्कचा दर 35 ते 45 दरम्यान असेल असे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे अन्य मास्क व सॅनिटाइझरच्या दरातही कपात केली जाईल.

 

Comments are closed

error: Content is protected !!