सांगवी,दि.१४ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेम संबंधाच्या रागातून दोन जनांनी प्रियकराचा धारदार हत्याराने वार करून खून केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या पत्नीचे मृत सौरभ जाधव याच्याशी लग्नापूर्वी प्रेम संबंध होते. याचा राग मनात ठेवून सांगवीतील जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आरोपी आयाज शेख व सोन्या बाराथे यांनी रविवार दि.१३ रोजी दुपारी १२.३० वा. सौरभ व्यंकट जाधव (वय २८ , राहणार – संजयनगर, औध) यास बोलण्यासाठी बोलावून त्याच्यावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक चौकशी सांगवी पोलिस करत आहेत.
Comments are closed