दिल्ली, दि. १५ (punetoday9news):- एनर्जी वेपनच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची योजना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) तयार करत आहे. एनर्जी वेपन हे भविष्यातील युद्ध लढण्याचे तंत्रज्ञान असून यामध्ये लेझर किरण आणि उच्च क्षमतेच्या सूक्ष्म लहरींचा समावेश होतो.
या तंत्रज्ञनामध्ये मिसाइलशिवाय फायटर विमान नष्ट करण्याची टेक्नोलॉजी असून चीन आणि युरोपियन देश या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मेहनत घेत असून भारतानेही यासाठी सुरुवात केली आहे.
100 किलोवॅट पॉवरची वेगवेगळी डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) देशांतर्गत उद्योगाच्या मदतीने विकसित करण्याचे लक्ष्य असून अनेक DEW प्रकल्पांवर DRDO कार्य करत आहे.
यात केमिकल ऑक्सिजन आयोडाइन, हायपॉवर फायबर लेझर ते गुप्त ‘काली’ प्रोजेक्ट आहे. काली हे पार्टीकल बीम वेपन आहे.
दरम्यान शत्रूची येणारी मिसाइल्स आणि फायटर विमाने काली प्रकल्पातंर्गत हवेतच नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न आहे. ड्रोन विरोधी DEW सिस्टिम DRDO ने आतापर्यंत विकसित केली असून याद्वारे 2 किमी रेंजमधील हवाई लक्ष्य भेदण्यासाठी 10 किलोवॅटचे DEW मशीन सक्षम असल्याची चाचणीही DRDO ने केली होती.
Comments are closed