नाशिक, दि. १६( punetoday9news):- आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे.म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला .त्यामुळे निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे. 

ते म्हणाले,  कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला आहे . फक्त २ ते ४ रुपये किलो भाव मिळत होता.या भावानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही.पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला.पण तो ही कांदा चाळीत सडला.थोडाफार कांदा शिल्लक राहिलाय .त्याला आता समाधानकारक दर मिळतोय पण झालेले नुकसान बघता शेतकऱ्यांच्या हातात काही राहनार नाही. त्यात निर्यात बंदी मुळे भाव पडले तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल. व कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होतील.

Comments are closed

error: Content is protected !!