शेतकरी संतप्त, निर्यात बंदी हटवण्याची मागणी. 

 

दिल्ली, दि. १५ ( punetoday9news):- केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली असून यामुळे शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अशातच शरद पवार यांनी आज पियुष गोयल यांची भेट घेतली.

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्यातबंदी लागू केली आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘केंद्रसरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी रात्री संपर्क करून केंद्रसरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली.’

आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो.’ , असेही शरद पवार यांनी पियुष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदा निर्यातबंदी बाबत फेरविचार करावा अशी विनंतीही शरद पवार यांनी यावेळी केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे .

 

Comments are closed

error: Content is protected !!