राजस्थान दि.१६( punetoday9news): राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात गोठडा गावातून चंबळ नदी ओलांडत असताना जवळपास ५० प्रवाशांसह एक बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे. यातील २० जणांना वाचवण्यात यश आले आहे.
या बोटीत प्रवास करणाऱ्यांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्धांचा समावेश होता. सदरील दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून १४ जण बेपत्ता आहेत.
चंबळ नदीत बुंदी जिल्ह्याच्या सीमेवर गोठडा कला गावाजवळ ही घटना घडली असून बोटीत काही प्रवाशांशिवाय सामान आणि वाहनेही भरली होती.
बोटीतून बुंदी भागातील कमलेश्वर धामकडे प्रवासी जात होते. मात्र नदीच्या मध्यभागात असतानाच बोट उलटून हा अपघात घडला.यावेळी एकानेही लाईफ जॅकेट घातले नव्हते. नदीकिनारी असणाऱ्या लोकांनी बुडणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/ashokgehlot51/status/1306112883151892480?s=19
या घटनेवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो असे सांगून त्यांनी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
Comments are closed