मुंबई, दि. १७ ( punetoday9news):-  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या पोलीस विभागातील साडेबारा हजार रिक्त जागांच्या भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याचीमाहिती दिली आहे. 

 त्याचबरोबर मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही. त्यांच्यासाठी 13 टक्के जागा बाजूला काढण्यासाठी कायदेशीर बाबीही तपासणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले आहे .

अनिल देशमुख म्हणाले, “मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पोलीस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढल्या जातील. यासाठी कायदेशीर बाबींची देखील तपासणी केली जाईल. राज्य शासनाचा मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आहे.”

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!