पिंपळे गुरव, दि. १७ (punetoday9news):- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका उषा मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त “सेवा सप्ताह” कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या हस्ते उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ, मिठाई व मास्क वाटण्यात आले.
यावेळी ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी सृष्टी चौक येथील प्लेग्राउंड या ठिकाणी झाली यात ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सिजन लेवल तपासणी, टेंपरेचर तपासणी करण्यात आली.
सदर प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका उषा मुंढे, नगरसेवक सागर आंघोळकर, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय मराठे, ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक शांताराम माने, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सूनिता कुंवर, मनिषा हँगरगे, संगीता रावते, ज्योती कोळी, सुनील देवकर, शिवाजी कदम, प्रकाश कांबळे, आकाश उप्पल इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed