जेजुरी,दि. १७ ( punetoday9news):- मेक इन इंडियाच्या काळात देशामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. बँकिंग क्षेत्र, दळणवळण, सॉप्टवेअर, भाषांतर, जाहिरात, पत्रकारिता, मीडिया या सर्वच क्षेत्रात आज तरुणांना संधी खुणावत आहेत.यासाठी हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे अशी भावना लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालय,अलीबागच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ.संगीता चित्रकोटी यांनी हिंदी दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात व्यक्त केली.
शरदचंद्रजी पवार महाविद्यालय,जेजुरी येथील हिंदी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाची एकता व अखंडता ही देशाचे संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राष्ट्रभाषा यावर अवलंबून असते. परंतु आजही राष्ट्रभाषेबाबतची आपली मानसिकता संपूर्ण देशामध्ये रुजलेली नाही. त्यामुळे देशाच्या एकसंघतेबाबत प्रश्न निर्माण होतो. असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी,प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ.बेबी कोलते-घोगरे यांनी केले.सूत्रसंचालन संगीता पवार यांनी केले तर आभार किरण तोडकर हिने मानले.
Comments are closed