साांगवी:- जुनी सांगवी येथे अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर लद्दाख येथे भारत-चीन सीमेवरील हल्ल्या दरम्यान शहीद झालेल्या जवानांना वंदन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच शहिदांच्या परिवाराला या परिस्थितीतून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी भारतीय सैनिक हवालदार राजेश भडकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिनकर इंगळे, शेषराव कसबे राजेंद्र ढोरे, जीवन कांबळे, राजू खुडे, गणेश मानकर सुधाकर कदम, नरेंद्र कसबे, सनी कसबे, पवन भडकवाड, साधना कसबे, वर्षा कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचेआयोजन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवा काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे यांनी केले.
बातमी साठी संपर्क
पत्रकार:- सागर झगडे.
Punetoday9news
9922557929
https://www.facebook.com/Punetoday9news-101032248270477/
फेसबूक पेज ला लाईक करायला विसरू नका. ?
Comments are closed