पुणे, दि.१८ ( punetoday9news):-
‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने १ लाख ११ हजार एकशे अकरा रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’साठी दिला आहे. हवेली तालुका कमिटीचे अध्यक्ष संतोष महाराज काळोखे-देहूकर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात आज सुपूर्द करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष आनंद महाराज तांबे, जिल्हा अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, हवेली तालुका उपाध्यक्ष तुषार महाराज चौधरी, देहूचे माजी सरपंच कांतीलाल काळोखे, तीर्थक्षेत्र कमिटीचे उपप्रमुख बापूसाहेब कंद, दिंडी प्रमुख पोपट महाराज आवळे, संतोष बालवडकर, विलास उंद्रे, दिनकरराव भालेकर, प्रशांत काळोखे, दिनकरराव पिंगळे, उपस्थित होते.
‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक व्यक्ती, औद्यागिक संस्था, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजाच्या विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या ‘हवेली तालुका कमिटी’च्यावतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्यात आला आहे.
Comments are closed