मुंबई, दि. १९( punetoday9news):- शाळा प्रवेशासाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण असणे ग्राह्य धरले जाणार असून यामुळे जूनअखेरपर्यंत मूल साडेपाच वर्षाचे असल्यावरच त्याला पाहिलीत प्रवेश घेता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२०२१ पासून प्ले ग्रुप, नर्सरी प्रवेशासाठी बालकाने वयाची तीन वर्षे पूर्ण करणे आवश्यक असेल. तसेच डिसेंबरपर्यंत ६ वर्षे पूर्ण असलेल्या बालकाला पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे.
पहिली प्रवेशासाठी बालकाचे वय ३१ जुलैपर्यंत ६ वर्षे पूर्ण असावे अशी अट असल्याने ऑगस्टमध्ये जन्मलेल्या बालकांना या नियमाचा तोटा होत होता.
यानंतर २०१७ मध्ये या निकषात सुधारणा करून ३० सप्टेंबपर्यंतचे ६ वर्षे वय ग्राह्य़ धरण्याचा निर्णय घेतला. मात्र यामुळे ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या बालकांना याचा तोटा होत होता.
शिक्षण विभागाने पुन्हा १५ ऑक्टोबपर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिली प्रवेशासाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही हि अट बदलण्याची पालकांची मागणी होती.
यामुळे ३१ डिसेंबपर्यंत ६ वर्षे पूर्ण होत असलेल्या मुलांना येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२१-२०२२) जुनमध्येच पहिलीला प्रवेश देण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.
Comments are closed