दिल्ली, दि.२०( punetoday9news):- वादग्रस्त शेती विधेयके आज रविवारी राज्यसभेत मांडली जाणार असून, भाजपने पक्षादेश काढून सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. याआधी लोकसभेत आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली.
वादग्रस्त विधेयके
▪️ शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा)
▪️ शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी
▪️ कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती)
ही तीनही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचा आरोप करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेत अकाली दलाचे 3 सदस्य असून ते विधेयकाच्या विरोधात मतदान करतील.
राज्यसभेत शिवसेनेचे ३ सदस्य आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. या दोन्ही पक्षांच्या एकत्रित निर्णयाकडे भाजपचे लक्ष असेल.
सद्य:स्थितीत २४३ सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत भाजपकडे ८६ सदस्य असून, अण्णा द्रमुक, जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती आणि छोटे पक्ष मिळून १०२ पेक्षा जास्त संख्याबळ सत्ताधारी आघाडीकडे आहे.
केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी विधेयकांविरोधात पंजाबमध्ये आंदोलने सुरू असतानाच तेथील मुक्तसर जिल्ह्य़ात प्रीतम सिंग नावाच्या ७० वर्षांच्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.
Comments are closed