मुंबई, दि. २१(punetoday9news):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर मराठा समाजातर्फे आज सोलापुर मध्ये आंदोलन केले जात आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
यावेळी अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाबाबत पुढील रणनितीबाबत चर्चा केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. “मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली,” अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिली.
Comments are closed