पिंपरी : – ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी देण्याची मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंडू मारकड पाटील यांनी केली आहे.
 ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी बंडू मारकड पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आयोजित बैठकीत मारकड यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी बंडू मारकड पाटील यांना नियुक्तीपत्र दिले.
       मारकड यांनी सांगितले, की  काकडे यांनी संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील गरजूंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त कोट्यातून प्रवीण काकडे यांची आमदारपदी निवड करावी, अशी अपेक्षा आहे. 
          दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनेतील योगदान पाहून प्रवीण काकडे यांनी मारकड यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. धनगर जोडो अभियान, गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा, समस्यांचे निराकरण करणे आदी बाबी लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे कार्य शहरामध्ये मोठ्या जोमाने चालू आहे. विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन शहरात केले जाते. यापुढेही आपले काम अधिक जबाबदारीने पार पाडण्यास बांधील आहे.
       सुनिल बनसोडे (मराठावाडा अध्यक्ष), संजय खताळ (उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष), महावीर काळे (माध्यम प्रवक्ते)  महाराष्ट्र) हिरकांत गाडेकर (पुणे
जिल्हाध्यक्ष), दीपक भोजने (पिंपरी-चिचवड अध्यक्ष), संतोष पांढरे (युवक अध्यक्ष), संजय नायकुडे (महासचिव), यशोदा नायकुडे (पुणे जिल्हा युवती आघाडी अध्यक्षा), युवराज हराळ (उस्मानाबाद जिल्हा युवक अध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली.
 
बातमी साठी संपर्क.
punetoday9news
सागर झगडे. – 9922557929
punetoday9news@gmail.com

#

Comments are closed

error: Content is protected !!