पुुणे, दि.२२ ( punetoday9news):- MSP तो गॅरेंटेड भाव आहे, जो शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर मिळतो. मग बाजारात त्या पीकाची किंमत कमी असली, तरी चालेल. बाजारात होणाऱ्या चढ-उताराचा परिणाम शेतकऱ्यांवर पडू नये, यासाठीच हा निर्णय घेतला जातो.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध होत असतांनाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये(MSP) वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली.
गहू, चना, हरबरा यांसारख्या पिकांच्या किंमतींमध्ये खालीलप्रमाणे प्रति क्विंटल 50 ते 300 रुपयांची वाढ होणार आहे. जसे की,
पिक-आधीचा भाव- आताचा भाव
गहू – 1925 – 1975
ज्वारी – 1525 – 1600
मोहरी – 4425 – 4650
हरभरा – 4875 – 5100
मसुर – 4800 – 5100
Comments are closed