मुंबई, दि. २२( punetoday9news):- महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची वाढीव पदे यासंदर्भात विधानभवन येथे विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष  नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

विधानसभा अध्यक्ष पटोले म्हणाले, राज्याची भविष्यातील पिढी उत्तम घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून, शिक्षकांवर अन्याय होता कामा नये. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील (२००३ ते २०१९) शिक्षकांच्या वाढीव पदांना वेतन अनुदानासह मंजूरी देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. यासंदर्भातील उचित कार्यवाही करून अनुपालन अहवाल १५ दिवसांत सादर करावा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

दरवर्षी शिक्षण संचालकांनी या पदांसंदर्भातील अहवाल शालेय शिक्षण विभागाकडे पाठवावा व किमान कालावधीत त्यांना मंजुरी मिळावी यासाठी विभागाने कालमर्यादा आखून द्यावी, असे निर्देशही पटोले यांनी दिले.

या बैठकीस सर्वश्री आमदार डॉ. सुधीर तांबे, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे, माजी आमदार  दत्तात्रय सावंत, शिक्षण विभागाचे अधिकारी अ.वा.बोरवणकर, विधी व न्याय विभागाचे वि.वि.जीवने आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!