मुंबई, दि. २२ (punetoday9news):- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबत (एमटीडीसी) ‘वानखेडे स्टेडियम सफर’ या उपक्रमाचा प्रस्ताव दिला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. येत्या काही दिवसांत एमटीडीसी व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वानखेडे स्टेडियम सफर’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करीत आहेत. हा उपक्रम क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. पर्यटन विभागाच्या वतीने मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडियमच्या सफरसाठी विनंती केली. ही विनंती एमसीएने क्षणाचाही विलंब न लावता स्वीकारली. जगभरातील पर्यटक आणि क्रिकेट प्रेमींसाठी हा उपक्रम पर्वणी घेऊन येणार आहे. याआधी खासदार शरद पवार व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासोबत स्टेडियम सफर तसेच मुंबईतून बहरलेल्या क्रिकेटचे संग्रहालय बनवण्याबाबत चर्चा केली होती, यासाठीदेखील एमसीए तयार आहे.
Comments are closed