पुणे, दि. २२( punetoday9news):- राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.
ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत, त्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे. औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
या औषधांच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी केले आहे.
Comments are closed