राजस्थानकडून सॅमसनने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांसह 74 धावा केल्या. तर स्मिथनेही 69 धावा केल्या. तर शेवटच्या षटकात आर्चरने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 8 चेंडूत 27 धावा केल्या.

 Ipl 2020,दि. २३( punetoday9news):- राजस्थान रॉयल्सने सीजनची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थानने चेन्नईचा 16 धावांनी पराभव केला. राजस्थानने चेन्नईसमोर 217 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र चेन्नईला केवळ 200 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसने 72 धावांची खेळी केली. शेन वॉटसनने 33, मुरली विजयने 21, धोनीने , केदार जाधवने 22, तर सॅम कुर्रनने 17 धावा केल्या.

संज्ञा सॅमसनचे ह्या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक. 

संजू सॅमसनने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. आयपीएल 2020 मधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. सॅमसनने 32 चेंडूत एक चौकर 9 षटकारांसह 74 धावा केल्या. यासह सॅमसन आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थानकडून 2018 मध्ये जॉस बटलरने 18 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तसेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. याआधी केएल राहुलने 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

त्याआधी नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने संजू सॅमसन, कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चरच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईसमोर 217 धावाचं आव्हान ठेवले. सॅमसनने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांसह 74 धावा केल्या. तर स्मिथनेही 69 धावा केल्या. तर शेवटच्या षटकात आर्चरने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 8 चेंडूत 27 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने 3, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Comments are closed

error: Content is protected !!