नाशिक:-  या वर्षी नाशिक जिल्ह्यातील निर्यात झालेल्या द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे पैसे देण्यास अनेक निर्यात कंपन्यांनी कोरोनाचे कारण देऊन  टाळाटाळ केली आहे.भाव कमी करण्याचा शेतकऱ्यांवर दबाव वाढवला जात आहे.आज शेतकरी अडचणीत असताना सर्व लोकप्रतिनिधींनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालावे अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी खासदार भारती पवार यांची त्यांच्या नाशिक येथील निवासस्थानी भेट घेऊन केली.
   द्राक्ष उत्पादक तालुक्यातील सगळ्या आमदारांना देखील संदीप जगताप यांनी पत्र लिहले आहे. खा.भारती पवार व संदीप जगताप यांच्या बैठकीत एक्स्पोर्ट द्राक्ष अडचणीबरोबर लोकल व्यापाऱ्यांवर देखील कसे नियंत्रण आणायचे व दरवर्षी होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवायची या बाबत सविस्तर चर्चा झाली.
   लवकरच मी स्वतः  या प्रकरणात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करीन.असे आश्वासन यावेळी खा. भारती पवार यांनी संदीप जगताप यांना दिले. यावेळी जानोरी येथील योगेश तिडके देखील हजर होते.

#

Comments are closed

error: Content is protected !!