मुंबई, दि. २३( punetoday9news):- राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची चर्चा होत आहे . मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना, खडसेंबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचे सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, “एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली”.
एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला जयंत पाटील यांनी भाजपला दिला. तसेच भविष्यात खडसे राष्ट्रवादीत येतील का, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, राजकारणात जर-तरला फार महत्व नसते, असे म्हणत उत्तर देणे टाळले.
बाहेर होणाऱ्या हा बडा नेता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेच असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. मंत्रिपदावरुन उचलबांगडी केल्यापासून ते विधानसभा आणि विधानपरिषदेचे तिकीट कापण्यापर्यंत, आपली मुस्कटदाबी झाल्याचा खडसेंचा आरोप आहे.
भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात खलबतं सुरु आहेत. त्यामुळे भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील नेमका कोणता नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अशी चर्चा होत असताना, एकनाथ खडसेंचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते.
Comments are closed