दि.२३ (Punetoday9news):- टाइम मॅगझिनने २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते.

या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आले आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे.

टाइम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रातील १०० प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येतं. यावेळी अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!