कोल्हापूर, दि. २३ ( punetoday9news):- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज मराठा समाजातर्फे राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली.

येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक या गोलमेज परिषदेत देण्यात आली आहे. तसेच या गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्वांच्या सहमतीने मांडण्यात आले आहेत.

▪️ सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी.

▪️ राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.

▪️ स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.

▪️अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.

▪️ मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.

▪️ कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.

▪️ राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.

▪️ महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.

▪️ मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरी मिळावी.

▪️ राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.

▪️ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी.

▪️ राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.

▪️ मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

▪️ मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.

▪️ केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.

 

Comments are closed

error: Content is protected !!